आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘WECAN’ प्रकल्पांतर्गत नागपुरात महत्त्वपूर्ण चर्चा

आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रकल्प WECAN अंतर्गत नागपूर येथे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सुधामणी सोशल फाउंडेशन, किरण फाउंडेशन ट्रस्ट व ब्रँड कलाकोरा यांच्या संयुक्त उपक्रमातून आदिवासी महिलांना कौशल्य विकास, क्षमता वृद्धी, आणि उद्योजकता विकासासाठी मदत केली जात आहे. श्री. पंकज गौतम, संस्थापक, सुधामणि सोशल फाउंडेशन यांनी मा. आयुषी सिंग, भा.प्र.से., अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग, नागपूर यांची…
सुधामनी सोशल फाउंडेशनतर्फे नागपुरात गरजूंना ब्लँकेट (कंबल) वाटप

वाढत्या थंडीचा कडाका पाहता, समाजातील गरजू आणि निराधार घटकांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सुधामनी सोशल फाउंडेशन’ नेहमीच तत्पर असते. याच सामाजिक भावनेतून नागपूर येथे नुकताच ‘कंबल (ब्लँकेट) वाटप’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
सुधामनी सोशल फाउंडेशंच्या वतीने महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुधामनी सोशल फाउंडेशनच्या वतीने ग्राम पांढरीगोटा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गावातील नागरिक आणि फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत महामानवाच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि सामूहिक बुद्धवंदनेने करण्यात आली. सुधामनी सोशल फाउंडेशन नेहमीच सामाजिक…
आदिवासी कॉलनीतील महिलांसाठी ‘रोजगार मार्गदर्शन’ शिबिर संपन्न!

‘सुधामणी सोशल फाउंडेशन’च्या वतीने आदिवासी कॉलनीतील हनुमान मंदिर येथे महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने एक विशेष रोजगार माहिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांना विविध गृहउद्योग, शासनाच्या योजना आणि स्वयंरोजगाराच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी यावेळी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
ग्राम सातपुत्ती येथे महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा!

सुधामनी सोशल फाउंडेशनच्या वतीने शनिवार, दिनांक १३/१२/२०२५ रोजी मौजे सातपुत्ती येथे महिला बचत गटाची महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीमध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबन, बचत गटांचे नियोजन आणि भविष्यातील उद्योगांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.