आदिवासी कॉलनीतील महिलांसाठी ‘रोजगार मार्गदर्शन’ शिबिर संपन्न!
‘सुधामणी सोशल फाउंडेशन’च्या वतीने आदिवासी कॉलनीतील हनुमान मंदिर येथे महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने एक विशेष रोजगार माहिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात महिलांना विविध गृहउद्योग, शासनाच्या योजना आणि स्वयंरोजगाराच्या संधींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी यावेळी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.


