आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘WECAN’ प्रकल्पांतर्गत नागपुरात महत्त्वपूर्ण चर्चा

आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रकल्प WECAN अंतर्गत नागपूर येथे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सुधामणी सोशल फाउंडेशन, किरण फाउंडेशन ट्रस्ट व ब्रँड कलाकोरा यांच्या संयुक्त उपक्रमातून आदिवासी महिलांना कौशल्य विकास, क्षमता वृद्धी, आणि उद्योजकता विकासासाठी मदत केली जात आहे.

श्री. पंकज गौतम, संस्थापक, सुधामणी सोशल फाउंडेशन यांनी मा. आयुषी सिंग, भा.प्र.से., अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग, नागपूर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आदिवासी महिलांच्या उत्पादने विक्रीसाठी शाश्वत विपणन मंच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाले आहे.