सुधामणी सोशल फाउंडेशनच्या वतीने महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुधामणी सोशल फाउंडेशनच्या वतीने ग्राम पांढरीगोटा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी गावातील नागरिक आणि फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत महामानवाच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि सामूहिक बुद्धवंदनेने करण्यात आली.
सुधामणी सोशल फाउंडेशन नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत असते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून समाजात समता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्याचा संदेश देण्यात आला.



