ग्राम सातपुत्ती येथे महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा!
सुधामणी सोशल फाउंडेशनच्या वतीने शनिवार, दिनांक १३/१२/२०२५ रोजी मौजे सातपुत्ती येथे महिला बचत गटाची महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीमध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबन, बचत गटांचे नियोजन आणि भविष्यातील उद्योगांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.